आजची ओळख हसतमुख, निरागस, अजूनही लहान बाळ वाटाव अश्या चेहऱ्याची आणि त्या चेहऱ्याच्या आत घुसमटत असलेला पोरकेपणा, दुःख, जिद्द अन त्यातून निघालेल्या यशाच्या वाटसरूची.......
" ऊचे निचे रास्ते मंजिल है तेरी दूर
राह मे चलना राही तू ना होके मजबुर "
जिल्हा. लातूर, ता. रेणापूर १५ हजार लोकवस्ती असलेले पोहरेगाव हेच माझे गाव..!! माझा जन्म तिथलाच. किल्लारीच्या भूकंपग्रस्त म्हणलं तर वावगं ठरणार नाही. वैयक्तिक आयुष्यताही असेच भूकंप पचवत आलोय. आजवर स्वता विषयी कधीही कुठे लिहल नाही.. लिहणे सोडा पण घर कुटुंब याबाबत चर्चाही केली नाही. नव्हतच तस काही. ९ महिन्याचा असताना कौटुंबिक कलहात आई सोडून गेली. नंतर वडिलांनी दुसर लग्न केल, पण बोलतात की एखाद्याच्या नशिबी आईची माया नसतेच मी त्यातलाच. सावत्र आई आल्यावर वाताहत अजून वाढत गेली. पुढे आजोबा आणि काकांनीच सांभाळ केला. वडिलोपार्जित बर्यापैकी शेती होती पण मधल्या काळात घराचे वासे फिरले आणि शेतीही नावाला शिल्लक राहिली होती. पुढे वडील, काका लातूर शहरात हाताला मिळेल ते काम करण्यासाठी तिकडेच राहायला गेले. परंतु घरातला गोंधळ काही थांबला नाहीच ८वीत असताना बापाचीही सावली हरपली. थोडक्यात लहानपणापासूनच संघर्ष पाचवीला पुजलेला. आजी आजोबा /चुलते आणि काका-मावशी असा सर्वानी केलेला सांभाळ , त्यामुळे शेतीशी नाळ जोडली गेलेली .. आजही शेतीतील सर्व काम करू शकतो म्हणून पाय जमिनीवर आहेत . जिल्हा परिषद आणि लातुरातील नामांकित राजस्थान शाळेतील प्राथमिक शिक्षण. तिथूनच पुढे जनता विद्यालय पोहरेगाव माध्यमिक ९वि पर्यंत शिक्षण.. आणि याच वयात काही चुकांमुळे किंवा अल्लड वागणुकीमुळे चुलते आणि काकांनी एक निर्णय घेतला आणि मी पुण्यात आलो.. नेमका हाच आयुष्यातला मोठा परिवर्तनाचा टप्पा..
१०वि तशी पुण्यात नानापेठ मधील हॉस्टेल ला राहून १००% अभ्यास करून देण्याचा प्रयत्न केले परंतु गावाकडून फेकला गेलेला विद्यार्थी पुणेरी शिक्षण अंगी न पचल्यामुळे इंग्लिश विषय उडवून बसला. खरा शैक्षणिक संघर्ष सुरु झाला इथपासून .. मग आळंदी ( मार्च ) पंढरपूर (ऑक्टोबर )वारीप्रमाणे बहिस्थ विद्यार्थी म्हणून १२ वि आणि नंतर बीकॉम असं सर्व शिक्षण पूर्ण करण्यास तब्बल आयुष्याची ८ वर्ष घालवली. काकांच्या गावातील आणलेल्या एका शिक्षकांच्या सांगण्यावरून १०वी नंतर Retail Managment चा डिप्लोमा केलेला आणि त्याच्या बळावर D MART , Relince Retail , More Supermarket , Landmark Group( Spar ) , jumbo Electronics vijay Sales... अश्या तब्बल ६ नोकऱ्या बदलत राहुन आयुष्यात आर्थिक आणि मानसिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला पण नोकरीत काही मन लागेना. पुण्यात आल्यापासूनच पेपर टाकणे , नगरसेवकाच्या ऑफिस मध्ये काम करणे, नीलकमल सारख्या मोठ्या कंपनीत काम केल्यामुळे व्यवसाय आणि त्यातल्या खाचखळगायची थोडीफार बेसिक माहिती होती.. नोकऱ्यांचा आणि वैयक्तिक आयुष्याचा एवढा मोठा संघर्ष आणि अनुभवाची शिदोरी व फक्त १ लाख लिमिटचे २ क्रेडिट कार्डच्या जीवावर EFFICIENT CORPORATION नावाची industrial मालपुरवठा फर्म २०१५साली सुरु केली. तब्बल ४ ते ५ महिने बाजारात आणि कंपनीमध्ये पायपीट करून वेगवेगळ्या गोष्टी आणि त्यातले सर्व माहिती सोबत घेत गेलो. एका purchase मॅनेजरला तर भरपूर त्रास दिला काम मागणीसाठी महिनाभर दररोज एक कॉल करत होतो. एकदाची कटकट बंद करावी म्हणून त्याने शेवटी मराठी माणूस आणि माझा प्रामाणिक प्रयत्न पाहून एक छोट काम गरजेच्या वेळेस आणि अवघड थोडक्यात कुणीही न करू शकेल असं दिलं. एक कच्चा माल ऍडव्हान्स payment करून गुजरात मधून २ दिवसात आणायचा होता. नेमकं भांडवल नसणं गाडी ठरवणं २ दिवस रात्रदिवस १८००किमी प्रवास, कागतपत्राची पूर्तता करुन अश्या वेगवेगळ्या गोष्टींना तोंड देत तो माल कंपनीत ४७ व्या ताशी पोच केला. यातून एक विश्वास निर्माण झाला आणि तीच कंपनी आज सर्वात जास्त व्यवसाय देते.. यातून सांगायचं एवढंच कि आपले प्रामाणिक प्रयत्न आणि काही हि काम करण्याची जिद्द असेल तर कुठलीच गोष्ट तुम्हाला ध्येयापासून रोखु शकत नाही. या सर्व गोष्टींतून खुप काही शिकलो, धडपडलो पण सांगायला आंनद होतो कि शुन्यातून केलेली सुरवात आणि आज व्यवसाय १ करोडच्या उलाढालीपर्यंत येऊन पोहचलाय. २०१७-२०१८ हा आयुष्यातला सर्वात मोठा टप्पा नुकतंच एक Pvt ltd सुरु केलीय आणि ८ मे वाढदिवस आणि ९ मे लग्न असं सार काही सुरळीत चाललंय.
फेसबुक आणि झुक्याभाऊचे आभार आपण शब्दात कधीच मांडू देऊ शकत नाही. वेगवेगळ्या ग्रुपवर मूक वाचक म्हणून वावरणं मला नेहमीच आवडत आणि इथली प्रत्येक गोष्ट मनापासून भावते. इथली प्रत्येक गोष्टीतुन/ जोडले गेलेल्या व्यक्तीकडून सकारात्मक घेत आलं तर आयुष्य किती समृद्ध होत.

No comments:
Post a Comment