Friday, 29 June 2018

थोडंसं स्वतः बद्दल - संकलन यदु पाटील

 आजची ओळख हसतमुख, निरागस, अजूनही लहान बाळ वाटाव अश्या चेहऱ्याची आणि त्या चेहऱ्याच्या आत घुसमटत असलेला पोरकेपणा, दुःख, जिद्द अन त्यातून निघालेल्या यशाच्या वाटसरूची.......

" ऊचे निचे रास्ते मंजिल है तेरी दूर
  राह मे चलना राही तू ना होके मजबुर "


जिल्हा. लातूर, ता. रेणापूर १५ हजार लोकवस्ती असलेले पोहरेगाव हेच माझे गाव..!! माझा जन्म तिथलाच. किल्लारीच्या भूकंपग्रस्त म्हणलं तर वावगं ठरणार नाही. वैयक्तिक आयुष्यताही असेच भूकंप पचवत आलोय. आजवर स्वता विषयी कधीही कुठे लिहल नाही.. लिहणे सोडा पण घर कुटुंब याबाबत  चर्चाही केली नाही. नव्हतच तस काही. ९ महिन्याचा असताना कौटुंबिक कलहात आई सोडून गेली. नंतर वडिलांनी दुसर लग्न केल, पण बोलतात की एखाद्याच्या नशिबी आईची माया नसतेच मी त्यातलाच. सावत्र आई आल्यावर वाताहत अजून वाढत गेली. पुढे आजोबा आणि काकांनीच सांभाळ केला. वडिलोपार्जित बर्यापैकी शेती होती पण मधल्या काळात घराचे वासे फिरले आणि शेतीही नावाला शिल्लक राहिली होती. पुढे वडील, काका लातूर शहरात हाताला मिळेल ते काम करण्यासाठी तिकडेच राहायला गेले. परंतु घरातला गोंधळ काही थांबला नाहीच ८वीत असताना बापाचीही सावली हरपली. थोडक्यात लहानपणापासूनच संघर्ष पाचवीला पुजलेला.  आजी आजोबा /चुलते आणि काका-मावशी असा सर्वानी केलेला सांभाळ , त्यामुळे शेतीशी नाळ जोडली गेलेली .. आजही शेतीतील सर्व काम करू शकतो म्हणून पाय जमिनीवर आहेत . जिल्हा परिषद आणि  लातुरातील नामांकित राजस्थान शाळेतील प्राथमिक शिक्षण. तिथूनच पुढे जनता विद्यालय पोहरेगाव माध्यमिक ९वि पर्यंत शिक्षण.. आणि याच वयात काही चुकांमुळे किंवा अल्लड वागणुकीमुळे चुलते आणि काकांनी एक निर्णय घेतला आणि मी पुण्यात आलो.. नेमका हाच आयुष्यातला मोठा परिवर्तनाचा टप्पा..

१०वि तशी पुण्यात नानापेठ मधील हॉस्टेल ला राहून १००% अभ्यास करून देण्याचा प्रयत्न केले परंतु गावाकडून फेकला गेलेला विद्यार्थी पुणेरी शिक्षण अंगी न पचल्यामुळे इंग्लिश विषय उडवून बसला. खरा शैक्षणिक संघर्ष सुरु झाला इथपासून .. मग आळंदी ( मार्च ) पंढरपूर (ऑक्टोबर )वारीप्रमाणे बहिस्थ विद्यार्थी म्हणून १२ वि आणि नंतर बीकॉम असं सर्व शिक्षण पूर्ण करण्यास तब्बल आयुष्याची ८ वर्ष घालवली. काकांच्या गावातील आणलेल्या एका शिक्षकांच्या सांगण्यावरून १०वी नंतर Retail Managment चा डिप्लोमा केलेला आणि त्याच्या बळावर D MART , Relince Retail ,  More Supermarket , Landmark Group( Spar )  , jumbo Electronics vijay  Sales... अश्या तब्बल ६ नोकऱ्या बदलत राहुन आयुष्यात आर्थिक आणि मानसिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला पण नोकरीत काही मन लागेना. पुण्यात आल्यापासूनच पेपर टाकणे , नगरसेवकाच्या ऑफिस मध्ये काम करणे, नीलकमल सारख्या मोठ्या कंपनीत काम केल्यामुळे व्यवसाय आणि त्यातल्या खाचखळगायची थोडीफार बेसिक माहिती होती.. नोकऱ्यांचा आणि वैयक्तिक आयुष्याचा एवढा मोठा संघर्ष आणि अनुभवाची शिदोरी व फक्त १ लाख लिमिटचे २ क्रेडिट कार्डच्या जीवावर EFFICIENT CORPORATION नावाची industrial मालपुरवठा फर्म २०१५साली सुरु केली.  तब्बल ४ ते ५ महिने बाजारात आणि कंपनीमध्ये पायपीट करून वेगवेगळ्या गोष्टी आणि त्यातले सर्व माहिती सोबत घेत गेलो. एका purchase मॅनेजरला तर भरपूर त्रास दिला काम मागणीसाठी महिनाभर दररोज एक कॉल करत होतो. एकदाची कटकट बंद करावी म्हणून त्याने शेवटी मराठी माणूस आणि माझा प्रामाणिक प्रयत्न पाहून एक छोट काम गरजेच्या वेळेस आणि अवघड थोडक्यात कुणीही न करू शकेल असं दिलं.  एक कच्चा माल ऍडव्हान्स payment करून गुजरात मधून २ दिवसात आणायचा होता. नेमकं भांडवल नसणं गाडी ठरवणं २ दिवस रात्रदिवस १८००किमी प्रवास, कागतपत्राची पूर्तता करुन अश्या वेगवेगळ्या गोष्टींना तोंड देत तो माल कंपनीत ४७ व्या ताशी पोच केला. यातून एक विश्वास निर्माण झाला आणि तीच कंपनी आज सर्वात जास्त व्यवसाय देते.. यातून सांगायचं एवढंच कि आपले प्रामाणिक प्रयत्न आणि काही हि काम करण्याची जिद्द असेल तर कुठलीच गोष्ट तुम्हाला ध्येयापासून रोखु शकत नाही.  या सर्व गोष्टींतून खुप काही शिकलो, धडपडलो पण सांगायला आंनद होतो कि शुन्यातून केलेली सुरवात आणि आज व्यवसाय १ करोडच्या उलाढालीपर्यंत येऊन पोहचलाय. २०१७-२०१८ हा आयुष्यातला सर्वात मोठा टप्पा नुकतंच एक Pvt ltd सुरु केलीय आणि ८ मे वाढदिवस आणि ९ मे लग्न असं सार काही सुरळीत चाललंय.

फेसबुक आणि झुक्याभाऊचे आभार आपण शब्दात कधीच मांडू देऊ शकत नाही. वेगवेगळ्या ग्रुपवर मूक वाचक म्हणून वावरणं मला नेहमीच आवडत आणि इथली प्रत्येक गोष्ट मनापासून भावते. इथली प्रत्येक गोष्टीतुन/ जोडले गेलेल्या व्यक्तीकडून सकारात्मक घेत आलं तर आयुष्य किती समृद्ध होत.

Sunday, 11 February 2018

गडवाट प्रवास सह्याद्रीचा आयोजित "स्वराज्याची दक्खन दौलत : किल्ले जिंजी"




















गेल्या कितीक दिवसांपासून ज्या क्षणांची उत्कंठा लागली होती तो आजचा क्षण मुंबईकर तसेच सर्वच गडवाटकऱ्यांसाठी नेत्रदीपक व अविस्मरणीय ठरला...
कार्यक्रम सुरु झाला. विशाल पेडणेकर म्हणजे गडवाट परिवाराच्या जवळजवळ सर्व कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. दामोदर मगदूम सर आणि अनिकेत दादा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. ज्या क्षणांना अनुभवण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो कार्यक्रम सुरु झाला अनिकेत दादा म्हणजे अफलातून व्यक्तिमत्तव . जिंजी वर केलेला भाऊ माराठा आणि अनिकेत चा ३६० अभ्यास आणि त्याचा सादरीकरण आधीच पहिल्या कार्यकर्मात पुण्यात अनुभवलेल होतच. या दोन्हीचा अभ्यास एकत्रित मांडणं म्हणजे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. गडवाट प्रवास सह्याद्रीचा आयोजित "स्वराज्याची दक्खन दौलत : किल्ले जिंजी" या विषयावर बोलताना गडवाटकरी मित्र अनिकेत वाघ यांनी जिंजीच्या इतिहासाला उजाळा दिला तसेच ५० हुन अधिक वेळा केलेल्या जिंजी मोहिमेदरम्यान गवसलेल्या अनेक वास्तूंचा अवशेषांचा धांडोळा फोटो स्लाईड शोद्वारे सर्वांसमोर मांडला. हजार किलोमीटर लांब असलेल्या या किल्ल्यास अगदी जवळून भेटच दिल्याचा भास सर्वांनी अनुभवला. जिंजीचा इत्यंभूत इतिहास व भूगोल याबाबत असलेल्या प्रश्नांची उत्तरे सर्वांना मिळाली. जिंजीचा इतिहास भूगोल या साऱ्याचा एवढा मुद्देसूद अभ्यास भारतभरात कोणी केला असेल असं मला तरी वाटत नाही. आपल्या मंडळीच असं झालाय कि आपल्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पुढे जाऊन उर्वरित कालखंडाचा अभ्यास करावा असं वाटतच नाही. आणि सर्वजण जयंत्या पुरतेच आठवतात हि त्यातली मोठी शोकांतिका. १२५ वर्ष भोसले घराण्याच्या ८ पिढ्या आणि त्याची कार्य फक्त एका पट्टीत मोजणं आणि आपल्याला हवं तस त्यात मिर्च मसाला टाकून इतिहास समाजात पसरावंन हे कितपत योग्य आहे हे ज्या त्या वक्त्यांनाच माहित. अनिकेत दादाला परत ऐकून म्हणजे मोठी पर्वणी होती. जिंजीचा एवढा मोठा इतिहास आणि असंख्य असणाऱ्या घटना एवढ्या छोट्या कार्यक्रमात मांडणं आणि त्यावर घेतलेलं कष्ट यावर आपण काय बोलावं ते शब्दात मांडणी कारण अश्यक्यच. एवढा मोठा जाज्व्ल्य इतिहास एवढ्या छोट्या वेळेत मुद्देसूद मंडल्याबद्दल अनिकेत दादाचे खूप खूप आभार. अनिकेत दादा या सर्वावर तुझं पुस्तक याव हि माफक अपेक्षां कारण माझ्यासारख्या असंख्य इतिहासप्रेमींना असे सर्व कार्यक्रम पाहणं नशिबात नसत. ते तू लवकरात लवकर लिहावं. भाऊ नि असेच रत्न घडवलेत आणि इथून पुढंही घडत राहणार आपण चालवू हा पुढे वारसा .. अनिकेत कडक सॅल्यूट ... 
अजय दादाची भरपूर अशी काम आणि विचार ऐकत आलेलो आणि अनुंभवलेलेही. तरीही दरवेळेस नवीन मांडणी मनात घर करून जाते..
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात परिवर्तन करणाऱ्या हिंदनृपती छत्रपती थोरले शाहू महाराज व तब्बल २६ वर्ष मराठ्यांच्या स्वराज्याची आग कायम प्रज्वलित ठेवणाऱ्या त्यागमूर्ती महाराणी येसूबाई साहेब यांचा जाणूनबुजून दुर्लक्षित ठेवण्यात आलेला खरा इतिहास गडवाटचे आधारस्तंभ श्री. अजयदादा जाधवराव यांनी विस्तृतपणे सर्वांसमोर मांडला.. दादांनी भोसले कुळातील ८ व्यक्तीना सुरवातीलाच अभीवादन केलं आणि त्याबद्दलचा सर्व इतिहास हळू हळू मुद्देसूद अगदी उलगडत नेला.. दादाच्या म्हन्यांप्रमाणे यासर्वावर बोलण्यासाठी २ दिवस पुरणार नाहीत. शाहू महाराजांचा ११००km by १३०० km असणारा प्रदेश आणि त्या काळी चालणारा सर्व कारभार यावर परखड मते मांडली. १कोट mom असणाऱ्या कागपत्रामधून शाहू महाराजांचा इतिहास किती मोठा असू शकतो याची कल्पना करवली जात नाही मुंबईचे गडवाटकरी श्री. संदीप मोरे यांनी शिवरायांचे स्वराज्य व्यवस्थापन या विषयावर अतिशय उपयुक्त व मौलिक माहिती देत गडवाटकऱ्यांची मन जिंकली. तसेच स्वराज्याची ३री राजधानी कशी होती हे दाखवण्यासाठी जिंजी किल्ल्याचे छायाचित्रप्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. उपस्थित सर्व गडवाटकऱ्यांनी या प्रदर्शनास देखील उस्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात #photooftheday उपक्रमा अंतर्गत विजेत्यांना सन्मानपत्र आणि प्रमोद मूर्ती दादांच्या पैंटिंगची छायाचित्र देण्यात आलं. दामोदर मगदूम सरांच्या हस्ते मला हे प्रदान करण्यात आले हा क्षण आयुष्यभर आठवणीत राहील त्यासाठी मी गडवाट परिवाराचा कायम ऋणी राहील. गडवाटच्या प्रत्येक कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने होते आणि यामुळे सतत आम्हा सर्वांची राष्ट्रप्रथम हि भावना कायम जागृत राहते सदर कार्यक्रमास उपस्थित व सर्वतोपरी सहभागी झालेल्या सर्व गडवाटकरी मित्रांचे व सहकारी संस्थांच्या सदस्यांचे मनःपूर्वक आभार... आयोजक गडवाटकरी बांधूना विनंती you tube चॅनल वर विडिओ लवकरात लवकर अपलॊड करावा जेणेकरून अनुपस्थित बंधू त्याचा लाभ घेतील