Sunday, 11 February 2018

गडवाट प्रवास सह्याद्रीचा आयोजित "स्वराज्याची दक्खन दौलत : किल्ले जिंजी"




















गेल्या कितीक दिवसांपासून ज्या क्षणांची उत्कंठा लागली होती तो आजचा क्षण मुंबईकर तसेच सर्वच गडवाटकऱ्यांसाठी नेत्रदीपक व अविस्मरणीय ठरला...
कार्यक्रम सुरु झाला. विशाल पेडणेकर म्हणजे गडवाट परिवाराच्या जवळजवळ सर्व कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. दामोदर मगदूम सर आणि अनिकेत दादा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. ज्या क्षणांना अनुभवण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो कार्यक्रम सुरु झाला अनिकेत दादा म्हणजे अफलातून व्यक्तिमत्तव . जिंजी वर केलेला भाऊ माराठा आणि अनिकेत चा ३६० अभ्यास आणि त्याचा सादरीकरण आधीच पहिल्या कार्यकर्मात पुण्यात अनुभवलेल होतच. या दोन्हीचा अभ्यास एकत्रित मांडणं म्हणजे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. गडवाट प्रवास सह्याद्रीचा आयोजित "स्वराज्याची दक्खन दौलत : किल्ले जिंजी" या विषयावर बोलताना गडवाटकरी मित्र अनिकेत वाघ यांनी जिंजीच्या इतिहासाला उजाळा दिला तसेच ५० हुन अधिक वेळा केलेल्या जिंजी मोहिमेदरम्यान गवसलेल्या अनेक वास्तूंचा अवशेषांचा धांडोळा फोटो स्लाईड शोद्वारे सर्वांसमोर मांडला. हजार किलोमीटर लांब असलेल्या या किल्ल्यास अगदी जवळून भेटच दिल्याचा भास सर्वांनी अनुभवला. जिंजीचा इत्यंभूत इतिहास व भूगोल याबाबत असलेल्या प्रश्नांची उत्तरे सर्वांना मिळाली. जिंजीचा इतिहास भूगोल या साऱ्याचा एवढा मुद्देसूद अभ्यास भारतभरात कोणी केला असेल असं मला तरी वाटत नाही. आपल्या मंडळीच असं झालाय कि आपल्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पुढे जाऊन उर्वरित कालखंडाचा अभ्यास करावा असं वाटतच नाही. आणि सर्वजण जयंत्या पुरतेच आठवतात हि त्यातली मोठी शोकांतिका. १२५ वर्ष भोसले घराण्याच्या ८ पिढ्या आणि त्याची कार्य फक्त एका पट्टीत मोजणं आणि आपल्याला हवं तस त्यात मिर्च मसाला टाकून इतिहास समाजात पसरावंन हे कितपत योग्य आहे हे ज्या त्या वक्त्यांनाच माहित. अनिकेत दादाला परत ऐकून म्हणजे मोठी पर्वणी होती. जिंजीचा एवढा मोठा इतिहास आणि असंख्य असणाऱ्या घटना एवढ्या छोट्या कार्यक्रमात मांडणं आणि त्यावर घेतलेलं कष्ट यावर आपण काय बोलावं ते शब्दात मांडणी कारण अश्यक्यच. एवढा मोठा जाज्व्ल्य इतिहास एवढ्या छोट्या वेळेत मुद्देसूद मंडल्याबद्दल अनिकेत दादाचे खूप खूप आभार. अनिकेत दादा या सर्वावर तुझं पुस्तक याव हि माफक अपेक्षां कारण माझ्यासारख्या असंख्य इतिहासप्रेमींना असे सर्व कार्यक्रम पाहणं नशिबात नसत. ते तू लवकरात लवकर लिहावं. भाऊ नि असेच रत्न घडवलेत आणि इथून पुढंही घडत राहणार आपण चालवू हा पुढे वारसा .. अनिकेत कडक सॅल्यूट ... 
अजय दादाची भरपूर अशी काम आणि विचार ऐकत आलेलो आणि अनुंभवलेलेही. तरीही दरवेळेस नवीन मांडणी मनात घर करून जाते..
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात परिवर्तन करणाऱ्या हिंदनृपती छत्रपती थोरले शाहू महाराज व तब्बल २६ वर्ष मराठ्यांच्या स्वराज्याची आग कायम प्रज्वलित ठेवणाऱ्या त्यागमूर्ती महाराणी येसूबाई साहेब यांचा जाणूनबुजून दुर्लक्षित ठेवण्यात आलेला खरा इतिहास गडवाटचे आधारस्तंभ श्री. अजयदादा जाधवराव यांनी विस्तृतपणे सर्वांसमोर मांडला.. दादांनी भोसले कुळातील ८ व्यक्तीना सुरवातीलाच अभीवादन केलं आणि त्याबद्दलचा सर्व इतिहास हळू हळू मुद्देसूद अगदी उलगडत नेला.. दादाच्या म्हन्यांप्रमाणे यासर्वावर बोलण्यासाठी २ दिवस पुरणार नाहीत. शाहू महाराजांचा ११००km by १३०० km असणारा प्रदेश आणि त्या काळी चालणारा सर्व कारभार यावर परखड मते मांडली. १कोट mom असणाऱ्या कागपत्रामधून शाहू महाराजांचा इतिहास किती मोठा असू शकतो याची कल्पना करवली जात नाही मुंबईचे गडवाटकरी श्री. संदीप मोरे यांनी शिवरायांचे स्वराज्य व्यवस्थापन या विषयावर अतिशय उपयुक्त व मौलिक माहिती देत गडवाटकऱ्यांची मन जिंकली. तसेच स्वराज्याची ३री राजधानी कशी होती हे दाखवण्यासाठी जिंजी किल्ल्याचे छायाचित्रप्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. उपस्थित सर्व गडवाटकऱ्यांनी या प्रदर्शनास देखील उस्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात #photooftheday उपक्रमा अंतर्गत विजेत्यांना सन्मानपत्र आणि प्रमोद मूर्ती दादांच्या पैंटिंगची छायाचित्र देण्यात आलं. दामोदर मगदूम सरांच्या हस्ते मला हे प्रदान करण्यात आले हा क्षण आयुष्यभर आठवणीत राहील त्यासाठी मी गडवाट परिवाराचा कायम ऋणी राहील. गडवाटच्या प्रत्येक कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने होते आणि यामुळे सतत आम्हा सर्वांची राष्ट्रप्रथम हि भावना कायम जागृत राहते सदर कार्यक्रमास उपस्थित व सर्वतोपरी सहभागी झालेल्या सर्व गडवाटकरी मित्रांचे व सहकारी संस्थांच्या सदस्यांचे मनःपूर्वक आभार... आयोजक गडवाटकरी बांधूना विनंती you tube चॅनल वर विडिओ लवकरात लवकर अपलॊड करावा जेणेकरून अनुपस्थित बंधू त्याचा लाभ घेतील